आयुर्वेदानुसार तांबं – पितळच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.
तांब्याचे भांडे वापरण्यामागील इतर कारणे…
१)पाणी शुद्ध होणे : आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात. विशेषत: पोटाशी संबंधित समस्या मुळापासून नष्ट होतात.
२)त्वचा उजळते :
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्कीन(मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.
३)थायरॉइड आजार दूर होतो :
तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवते तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास थायरॉइड आजार नियंत्रणात येतो.
४)अॅसिडीटी, गॅस दूर होतो :
अॅसिडीटी, गॅस किंव्हा पोटाची इतर समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. यामुळे पोटाचे सर्व आजार दूर होतात.
५)वजन कमी होते :
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास लाभ होईल. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल.
६)घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात :
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव तसेच डायरिया, अतिसार, कावीळ यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले किटाणू नष्ट होतात.
७)सांधेदुखीत आराम मिळतो :
आजकाल कमी वयातच अनेक लोकांना सांधेदुखीचा आजार होत आहे. तुम्हीही या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणार्या त्रासापासून आराम मिळतो.
८)अॅनिमियाशी सामना करतो :
शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न (लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अॅनिमियाशी सामना करणार्यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
म्हणून रोगांना दूर ठेवण्यासाठी तांब्याच्याभांड्यांचा वापर करणे जरुरी आहे. आणि म्हणूनच आपण पूर्वीपासूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करत आलो आहे, एवढेच नाही तर आपण पूजेतही तांब आणि पितळाच्या भांड्यांचाच वापर करतो.
चला तर जाणून घेऊ आपल्या कडे पूजेत का वापरतात तांब्याच्या वस्तू
आपल्याकडे पूजेत वापरण्यात येणारी ताम्हण, पळी, भांड, देव्हाऱ्यातील देवदेवतांच्या मूर्तीदेखील तांब्यापितळ्याच्या असतात.
● कारण तांबं – पितळ या धातूंची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते.
● तांब्या- पितळ्याच्या लालसर व सोनेरी रंगांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मनाची प्रसन्नता वाढते.
*● आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता तांब्या- पितळ्याच्या भांड्यात तीन तास ठेवलेले पाणी निर्जंतुक होत असल्याने पाणी उकळण्याचा खर्चदेखील वाचतो.*